सताळ्यातील शिबिरात ४२ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST2020-12-13T04:34:31+5:302020-12-13T04:34:31+5:30
उद्घाटन माजी आ. बब्रुवान खंदाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. स्नेहा गंडले, डॉ. स्नेहा देशमुख, गिरीष मुसंडे, वैद्यकीय ...

सताळ्यातील शिबिरात ४२ जणांचे रक्तदान
उद्घाटन माजी आ. बब्रुवान खंदाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. स्नेहा गंडले, डॉ. स्नेहा देशमुख, गिरीष मुसंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नागनाथ नागरगोजे, डॉ. फड यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी सुनील मुंढे, राघवेंद्र सताळकर, हनुमंत खंदाडे, रंगनाथ शिंदे, राजाभाऊ खंदाडे, गिरीश मुसंडे यांनी परिश्रम घेतले.
किनगाव ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन
किनगाव : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त येथील ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच किशोर मुंडे, सदस्य धम्मानंद कांबळे, माजी सदस्य सुजित कल्याणे, श्रीरंग पत्की, कृष्णा मुंडे, दयाराम हंगे, शिंगाडे, मेघराज चावरे, प्रितम कांबळे, कुंडलिक यरमुळे आदींची उपस्थिती होती.
संत मोतीराम महाराज विद्यालयात कार्यक्रम
किनगाव : येथील श्री संत मोतीराम महाराज विद्यालयात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्था सचिव प्रा. एन. बी. फड, मुख्याध्यापिका एस. टी. घुले यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.