शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST

लातूर : ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील-निलंगेकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वाखाली लातूरमधील ...

लातूर : ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील-निलंगेकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वाखाली लातूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शनिवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ओबीसी समाजाच्‍या आंदोलनाला सर्व समाजाचा पाठिंबा असल्‍याचे सांगत माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील-निलंगेकर म्‍हणाले, ओबीसी समाजाच्‍या आरक्षणाला धक्‍का न लावता भाजप सरकारने मराठा आरक्षण दिले होते. राज्‍यातील महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात गृह, आरोग्‍य, कृषी यासह विविध विभागांत मोठा भ्रष्‍टाचार झाल्याचा आरोप आमदार निलंगेकर यांनी केला. मराठा आणि ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण न्‍यायालयात व्‍यवस्थित बाजू मांडली नसल्‍याने रद्द ठरले. या दोन्‍ही समाजाला आरक्षण मिळावे, हीच भाजपची भूमिका आहे. जोपर्यंत हक्‍काचे आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत भाजपचा संघर्ष सुरुच राहणार आहे, असेही ते म्हणाले. ज्या-ज्यावेळी लातूरवर संकट आले तेव्‍हा आम्‍ही रस्‍त्‍यावर उतरलो. सत्‍ताधारी नेते लातूरवर कोरोनाचे मोठे संकट आले त्यावेळी कुठे होते? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडी सरकारने मराठा आणि ओबीसींचे आरक्षण घालवले. एस. सी., एस. टी. पवर्गाची पदोन्‍नती थांबवली. रद्द झालेले आरक्षण परत मिळाले नाही तर सत्ताधाऱ्यांना ओबीसी समाज धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड म्‍हणाले. आघाडी सरकारच्‍या कार्यकाळात शेतकरी, कष्‍टकरी, गोरगरीब यांच्यासह कुठलाही समाज समाधानी नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, माजी आमदार शिवाजीराव पाटील-कव्हेकर, देविदास काळे, भागवत सोट, स्वाती जाधव, प्रेरणा होनराव, व्यंकट पन्हाळे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शैलेश गोजमगुंडे यांनी केले. यावेळी शैलेश लाहोटी, प्रदीप पाटील-खंडापूरकर, मनीष बंडेवार, अजित पाटील-कव्हेकर, दिग्विजय काथवटे, विजय काळे, गोविंद नरहरे आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.