आधारकार्डच्या आधारे दिली जन्माची प्रमाणपत्रे! रद्द करण्याची किरीट साेमय्या यांची माणगी
By राजकुमार जोंधळे | Updated: May 21, 2025 07:55 IST2025-05-21T07:55:11+5:302025-05-21T07:55:27+5:30
संबंधित अर्जदारांची पार्श्वभूमी आणि माहिती खरी आहे का? याची पोलिसासह इतर यंत्रणांनी चौकशी करावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

आधारकार्डच्या आधारे दिली जन्माची प्रमाणपत्रे! रद्द करण्याची किरीट साेमय्या यांची माणगी
लातूर : येथील तहसिलदारांनी २५ ते ६५ वयोगटातील तब्बल ४७६ अर्जदारांना केवळ आधारकार्डच्या आधारे जन्मतारीख आणि जन्मठिकाणाचा पुरावा मानून जन्माची प्रमाणपत्रे जारी केली आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीने हा अहवाल दिला आहे. संबंधित अर्जदारांची पार्श्वभूमी आणि माहिती खरी आहे का? याची पोलिसासह इतर यंत्रणांनी चौकशी करावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही सर्व माहिती उघड करण्याची मागणी केली असून, या सर्व संशयास्पद जन्म प्रमाणपत्रांना तातडीने रद्द करावे. यासाठी त्यांनी काही महिन्यांपूर्वी लातूर जिल्ह्याचा दाैराही केला हाेता. दरम्यान, या दाैऱ्यात हा संशयही त्यांनी व्यक्त करुन, चाैकशीची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली हाेती. आज जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने चाैकशी केल्यानंतर ४७६ अर्जदानांना आधार कार्डच्या आधारे जन्मतारीख आणि जन्म ठिकाणाचा पुरावा ग्राह्य धरुन प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे.