हणमंत गायकवाड
लातूर : तांत्रिक अडचणींमुळे 'नीट' परीक्षेचा फॉर्म भरण्यापासून वंचित राहिलेल्या लातूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अर्ज भरण्यासाठी आता ११ मार्च रोजी रात्री ९ वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विशेष म्हणजे, संथ चालणाऱ्या सर्व्हरने आता वेग घेतल्याने पालकांची आणि विद्यार्थ्यांची चिंता मिटली आहे.
नीट परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख सुरुवातीला ८ मार्च होती. मात्र, ५ ते ८ मार्च दरम्यान सर्व्हरमध्ये प्रचंड तांत्रिक बिघाड झाल्याने एक फॉर्म भरण्यासाठी तब्बल अडीच ते तीन तास लागत होते. यामुळे लातूर शहर व जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी अर्ज करण्यापासून वंचित राहिले होते. पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
आताची स्थिती : २० मिनिटांत फॉर्म पूर्ण !मुदतवाढीसोबतच आता साईटचा वेगही वाढला आहे. जिथे आधी तासनतास लागायचे, तिथे आता अवघ्या २० मिनिटांत फॉर्म पूर्ण अपलोड होत आहे.
अर्जाची नवीन मुदत : ११ मार्च, रात्री ९:०० वाजेपर्यंत.शुल्क भरण्याची मुभा : ११ मार्च, रात्री ९:३० वाजेपर्यंत.
शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते...
अनेक विद्यार्थी तांत्रिक अडचणींमुळे फॉर्म भरू शकले नव्हते. मात्र, आता एजन्सीकडून मुदतवाढ मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची ही मोठी अडचण दूर झाली आहे.— विनोद झरीटाकळीकर, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर.
सध्या साईटने चांगला वेग घेतला आहे. २० मिनिटांत फॉर्म अपलोड होत असल्याने आता विद्यार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही."-सचिन बांगड, विद्यार्थी समुपदेशक व मार्गदर्शक.
सर्व्हरच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. परीक्षा एजन्सीने मुदतवाढ देऊन विद्यार्थ्यांना न्याय दिला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार.-भाऊसाहेब सरवदे, उपप्राचार्य, दयानंद विज्ञान महाविद्यालय.
Web Summary : NEET application deadline extended to March 11th due to technical issues. Server speed improved, addressing student concerns. Experts appreciate the extension, easing student difficulties and ensuring fair opportunity. Students can now complete forms quickly.
Web Summary : तकनीकी दिक्कतों के चलते नीट आवेदन की अंतिम तिथि 11 मार्च तक बढ़ाई गई। सर्वर की गति में सुधार, छात्रों की चिंताएं दूर हुईं। विशेषज्ञों ने विस्तार की सराहना की, छात्रों की कठिनाइयों को कम किया और उचित अवसर सुनिश्चित किया। छात्र अब जल्दी फॉर्म भर सकते हैं।