राजकुमार जोंधळे, लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध व्यवसायाविरोधात विशेष मोहीम उघडण्यात आली आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात ९१ लाख १६ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात १३३ जणांना अटक केली असून, याप्रकरणी लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात ११० स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील अवैध व्यवसायाविरोधात कारवाई करण्याचे आदेश विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिले आहेत.
१ ते ३१ मे या काळात टप्प्या-टप्प्यात चार आठवड्यांची ‘अवैध व्यवसाय विरोधी अभियान’ हाती घेतली आहे.
सलग तिसऱ्या आठवड्यात केलेल्या कारवाई लातूर जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत छापासत्र टाकण्यात आले आहे. यामध्ये मटका, जुगार, गांजा, अवैध दारु, हातभट्टी, वाळू उपासा यासह इतर अवैध व्यवसायाविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
पहिल्या दोन आठवड्यात १ ते १५ मे दरम्यान जिल्ह्यात ८१३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये तब्बल २ कोटी ३३ लाख ९५ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
१५ ते २१ मे या तिसऱ्या आठवड्यात नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण ३७३ गुन्हे दाखल केले आहेत. यात ४६७ आरोपींना अटक केली असून, तब्बल ४ कोटी ४८ लाख ६० हजार ९५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
४ जिल्ह्यात ३७३ गुन्हे दाखल; ४६४ आरोपींना अटक
नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात एकूण ३७३ गुन्हे दाखल केले असून, ४६४ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ४ कोटी ४८ लाख ६० हजार ९५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.