लातूरमध्ये एकाचा खून, मृतदेह गोरक्षण विहिरीत टाकला 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 12:30 PM2019-06-02T12:30:33+5:302019-06-02T12:35:43+5:30

लातूरमध्ये एकाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. भावडा सिंग जुन्नी (40 रा. इंडिया नगर, लातूर ) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्याचा मृतदेह अशोक हॉटेल परिसरातील एका गोरक्षणमधील विहिरीत टाकण्यात आला आहे.

bhavada singh junni murder in latur | लातूरमध्ये एकाचा खून, मृतदेह गोरक्षण विहिरीत टाकला 

लातूरमध्ये एकाचा खून, मृतदेह गोरक्षण विहिरीत टाकला 

googlenewsNext
ठळक मुद्देलातूरमध्ये एकाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. भावडा सिंग जुन्नी असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्याचा मृतदेह अशोक हॉटेल परिसरातील एका गोरक्षणमधील विहिरीत टाकण्यात आला.मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय व सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आला आहे.

लातूर  : लातूरमध्ये एकाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. भावडा सिंग जुन्नी (40 रा. इंडिया नगर, लातूर ) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्याचा मृतदेह अशोक हॉटेल परिसरातील एका गोरक्षणमधील विहिरीत टाकण्यात आला आहे. या घटनेने लातुरात खळबळ  उडाली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावडासिंग जुन्नी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय व सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचीन सांगळे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. हा खून नेमका का आणि कोणत्या कारणासाठी करण्यात आला याचा शोध पोलीस घेत आहेत. रात्रीच्यावेळी हा खून करुन मृतदेह या विहिरीत टाकण्यात आला असावा, असा प्राथमिक  संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. उत्तरीय तपासणीचा अहवाल जोपर्यंत हाती येत नाही तोपर्यंत तपासाला गती मिळणार नाही, असे डीवाएसपी सांगळे यांनी म्हटलं आहे. 

भावडासिंग जुन्नी यांच्या खूनामागची कारणे शोधण्यासाठी त्यांची कोणासोबत दुष्मनी होती का?  यापूर्वी त्यांचे कोणासोबत भांडण झाले होते का?  याचीही माहिती पोलीस घेत आहेत.  याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  भावडासिगं जुन्नी हा गेल्या दोन दिवसांपासून गायब होता. मोबाईलही त्याच्या पत्नीकडे होता. त्यामुळे त्यांचा कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला. पण  आढळून आला नाही. अखेर त्यांच्या पत्नीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पती हरवल्याची तक्रार शनिवार, 1 जून रोजी दिली आणि रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला. अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी दिली.

Web Title: bhavada singh junni murder in latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.