सामाईक विहिरीच्या पाण्यावरून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:15 IST2021-06-25T04:15:52+5:302021-06-25T04:15:52+5:30
मळणीयंत्राच्या पैशावरून कुऱ्हाडीने मारहाण चाकूर : मळणी यंत्राच्या पैशावरून कुऱ्हाडीने मारहाण झाल्याची घटना चाकूरनजीक घडली. याबाबत कोंढाळी येथील दोघांविरुद्ध ...

सामाईक विहिरीच्या पाण्यावरून मारहाण
मळणीयंत्राच्या पैशावरून कुऱ्हाडीने मारहाण
चाकूर : मळणी यंत्राच्या पैशावरून कुऱ्हाडीने मारहाण झाल्याची घटना चाकूरनजीक घडली. याबाबत कोंढाळी येथील दोघांविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मळणी यंत्राच्या पैशाच्या कारणावरून फिर्यादी निवृत्ती राम डोंबाळे यांना बाळू ज्ञानोबा डोंबाळे व अन्य एकाने शिवीगाळ करून कुऱ्हाडीने मारून जखमी केले. भांडण सोडविण्यास आलेल्या फिर्यादीच्या आई व मुलांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, असे निवृत्ती डोंबाळे यांनी चाकूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार बाळू डोंबाळे व अन्य एकाविरुद्ध कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक थोरमोटे करीत आहेत.
अहमदपूर रोडवर बोलत असताना मोबाईल पळविला
अहमदपूर : मोबाईलवर बोलत घराकडे पायी जात असताना (भाग्यनगर) अहमदपूर रोडवर माेटारसायकलवर पाठीमागून आलेल्या दोघांनी मोबाईल हिसकाऊन पळ काढल्याची घटना घडली. याबाबत मधुकर बाबूराव कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. मोबाईलची किंमत २५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड काॅन्स्टेबल जोंधळे करीत आहेत.
मांडणी शिवारातून गाय चोरीला
अहमदपूर : मांडणी शिवारातील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लाल कंधारी रंगाची गाय बांधली होती. अज्ञात चोरट्याने २२ जूनच्या रात्री या गायीची चोरी केली आहे. याबाबत नीळकंठ राचप्पा कोंधळे यांनी अहमदपूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड काॅन्स्टेबल भिसे करीत आहेत.