क्षुल्लक कारणावरून नळेगावात मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:14 IST2020-12-07T04:14:18+5:302020-12-07T04:14:18+5:30
चाकूर ते वाढवणा रस्त्याची दुरवस्था लातूर : जिल्ह्यातील चाकूर ते वाढवणा पाटी या २० किलोमीटर अंतराच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात ...

क्षुल्लक कारणावरून नळेगावात मारहाण
चाकूर ते वाढवणा रस्त्याची दुरवस्था
लातूर : जिल्ह्यातील चाकूर ते वाढवणा पाटी या २० किलोमीटर अंतराच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. केवळ थातूरमातूर डागडुजी केली जात असल्याने सातत्याने हा रस्ता उखडतो. हा मार्ग दोन तालुक्यांना जोडणारा आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाढवणा, सुकणी, मन्ना उमरगा, एकुर्का रोड, आडोळवाडी, केसगीरवाडी, डांगेवाडी, खेर्डा, किनी, डाऊळ, हिप्परगा, डोंग्रज, राचन्नावाडी, संगाचीवाडी, शेळगाव, कलकोटी, बोथी, हणमंतवाडी आदी गावच्या ग्रामस्थ, वाहनधारकांतून होत आहे.
पैशाच्या कारणावरून हिप्परग्यात मारहाण
लातूर : विहीर पाडल्याचे पैसे मुलास का देत नाहीस या कारणावरून एकास मारहाण करून जखमी करण्यात आल्याची घटना चवणहिप्परगा येथे घडली. याबाबत देवणी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद अभंग संभाजी बिरादार (७२) यांना विहीर पाडल्याच्या पैशाच्या कारणावरून दिगंबर तुळशीराम बिरादार याच्यासह अन्य तिघांनी दगडाने मारून जखमी केले. शिवाय, जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत देवणी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंद आहे.
हाळी हंडरगुळी येथील बसस्थानकाची दुरवस्था
लातूर : उदगीर तालुक्यातील नांदेड-बीदर राज्य मार्गावर असलेल्या हाळी हंडरगुळी येथील बसस्थानकाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. शौचालय आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. बसस्थानक परिसरात डांबरीकरण करण्यात न आल्याने सर्वत्र खडी असल्याचे दिसून येते. परिणामी, महामंडळ कर्मचाऱ्यांसह प्रवाशांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
प्रकल्पाखालील गावांत सिंचनाचे क्षेत्र वाढले
लातूर : यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला. परतीच्या पावसाने तर जिल्ह्याला झोडपून काढले. परिणामी, शेत-शिवारातील लघु, मध्यम आणि साठवण तलावातील जलसाठा यंदा वाढला. यातून प्रकल्पाखालील परिसरात सिंचनाचे क्षेत्र वाढले. त्याचबरोबर अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. पाण्याचा अंदाज घेऊन अनेक शेतकऱ्यांनी यंदा रबीचा पेराही मोठ्या प्रमाणात घेतला आहे. यातून भविष्यात खरिपातील नुकसानाची भरपाई रबीतून मिळेल.