पाण्याची बाटली अन् ग्लासचे पैसे मागितल्याने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST2021-06-26T04:15:12+5:302021-06-26T04:15:12+5:30
मालवाहतुकीच्या पिकअपची चोरी लातूर : औसा शहरातील घरासमोर पार्किंग केलेल्या (एमएच १३ एएन ८९६१) क्रमांकाच्या पिकअपची चोरी झाल्याची घटना ...

पाण्याची बाटली अन् ग्लासचे पैसे मागितल्याने मारहाण
मालवाहतुकीच्या पिकअपची चोरी
लातूर : औसा शहरातील घरासमोर पार्किंग केलेल्या (एमएच १३ एएन ८९६१) क्रमांकाच्या पिकअपची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत वसिम मोईन बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल औटे करत आहेत.
टागोर नगर येथून दुचाकीची चोरी
लातूर : टागोर नगर येथे घरासमोर पार्किंग केलेल्या (एमएच १२ एलएच २४९१) क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत अभिजित सुरेश गरड (रा. मासुर्डी, ता. औसा, ह. मु. टागोर नगर, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारू पिण्यास पैसे न दिल्याने मारहाण
लातूर : उधारीत सुपारी दे म्हणून शिवीगाळ करून दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणत लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना खाडगाव रोड येथे घडली. याबाबत विजय मदनसिंग बायस (रा. सुशिलादेवी कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्ता व्यंकट इटकर यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.