मारहाण करुन माेबाईल हिसकावला; बीड जिल्ह्यातून एका आराेपीला अटक!

By राजकुमार जोंधळे | Updated: February 14, 2024 20:15 IST2024-02-14T20:14:22+5:302024-02-14T20:15:36+5:30

स्थागुशाची कारवाई : दुचाकी, माेबाइल जप्त

beaten and snatched mobile phone an arrestee from beed district | मारहाण करुन माेबाईल हिसकावला; बीड जिल्ह्यातून एका आराेपीला अटक!

मारहाण करुन माेबाईल हिसकावला; बीड जिल्ह्यातून एका आराेपीला अटक!

राजकुमार जाेंधळे, लातूर: मारहाण करून माेबाइल हिसकावणाऱ्या अंबाजोगाई (जि. बीड) येथील एका आराेपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून १ लाख २८ हजारांचा मुद्देमालासह जप्त केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातुरातील दुचाकीवरून आलेल्या आराेपीने मारहाण करुन माेबाइल हिसकावत पळ काढला. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता. याबाबत पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले हाेते. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने चाेरट्याचा माग काढला.

खबऱ्याने या गुन्ह्यातील आरोपींची माहिती दिली. चाेरलेला मोबाइल कमी किमतीत विकण्यासाठी आलेल्या एकाला दुचाकीसह खाडगाव राेड भागातून ताब्यात घेतले. बालाजी बबन थाटकर (वय २८, रा. समतानगर, अंबाजोगाई, जि. बीड) असे त्याने नाव सांगितले. अधिक चौकशी केली असता, रस्त्याने जाणाऱ्या एकाला साथीदारासाेबत मारहाण करून माेबाइल हिसकावल्याची कबुली दिली. पाेलिस फरार आराेपीचा शाेध घेत असून, त्याच्याकडून मोबाइल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा १ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तपास एमआयडीसी ठाण्याचे पोउपनि. संदीप कराड हे करीत आहेत. 

ही कारवाई स्थागुशाचे सपोनि. व्यंकटेश पल्लेवाड, पोउपनि. संजीव भोसले, रियाज सौदागर, योगेश गायकवाड, राजेश कंचे, मोहन सुरवसे, संतोष खांडेकर, प्रदीप चोपणे, सायबर सेलचे शैलेश सुडे, गणेश साठे यांच्या पथकाने केली.

Web Title: beaten and snatched mobile phone an arrestee from beed district