मागील १९ दिवसांपासून केंद्र सरकारने कृषी क्षेत्रासाठी मंजूर केलेल्या कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. हे तिन्ही कायदे रद्द करुन मागे घेण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलन दरम्यान केंद्र सरकारच्या विराेधात घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींच्या नावे निवेदन पाठविण्यात येऊन हे कायदे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, रंगा राचुरे, विक्रांत भोसले, रामराव बिरादार, मधुकर एकुर्केकर, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, अहमद सरवर, लक्ष्मण सोनवळे, कुमार पाटील, अजित शिंदे, विनोद सुडे, सय्यद जानी, धनाजी मुळे, उदयसिंह मुंडकर, राजकुमार भालेराव, ईश्वर समगे, हबीबू रहेमान, शेख महेबूब, चाऊस फारुख, शेख फय्याज, हाश्मी वझी, विजयकुमार चवळे, यशवंत पाटील, किशन चव्हाण, आनंदराव मालोदे, माधव पाटील, बालाजी कुंडगीर, आदर्श पिंपरे, श्रीनिवास एकुर्केकर आदी उपस्थित होते.
***