बँड, बॅन्जो वादकांना आर्थिक मदतीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:24 IST2021-08-19T04:24:48+5:302021-08-19T04:24:48+5:30
प्राध्यापकांचे प्रश्न मार्गी लावणार लातूर : प्राध्यापकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, पीएच.डी., एम. फिल. आणि नेटच्या अनुषंगाने ...

बँड, बॅन्जो वादकांना आर्थिक मदतीची मागणी
प्राध्यापकांचे प्रश्न मार्गी लावणार
लातूर : प्राध्यापकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, पीएच.डी., एम. फिल. आणि नेटच्या अनुषंगाने असलेले सर्व प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन उच्चशिक्षण मंत्री उदय सावंत यांनी शिक्षक आमदार विक्रम काळे व सिनेट सदस्य प्रा. डॉ. अशोक मोटे यांनी प्राध्यापकांच्या प्रश्नावर आयोजित केलेल्या बैठकीत दिले. आमदार विक्रम काळे यांनी या बैठकीत मंत्री महोदयांसमोर विविध प्रलंबित प्रश्न मांडून लक्ष वेधले. यावेळी प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.
दयानंद महाविद्यालयात ‘आझादी का अमृत महोत्सव’
लातूर : येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत विविध उपक्रम साजरे करण्यात आले. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. साईनाथ उमाटे, ऋषिकेश भोसीकर, योगेश देशपांडे, वैभव ठाकूर, अभिजीत सुतार, अजय घाडगे, गणेश सावंत, असिफ शेख, विकास भोसले, सुरज जगताप, वेदिका गोरे, आरती सूर्यवंशी, सुजान हन्नूरे, पूनम साळुंके, पूनम दिवटे आदींसह स्वयंसेवक उपस्थित होते.
जिल्हाध्यक्षपदी विजय टाकेकर यांची निवड
लातूर : राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी विजय टाकेकर यांची निवड प्रदेशाध्यक्ष चेतन शिंदे यांनी केली आहे. या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर, डॉ. अशोक जिवतोडे, सुभाष घाटे, विजयकुमार पिनाटे, श्रीनिवास आकनगिरे, कोळगावे, माणिकराव बडे, सज्जनकुमार लोणाळे, रंजित मदने, सुदर्शन बोराडे, श्रीकांत मुद्दे, संजय क्षीरसागर, दिलीप पिनाटे आदींनी टाकेकर यांचे अभिनंदन केले आहे.
पोलीस जाणीव सेवा संघातर्फे वृक्षारोपण
लातूर : येथील पोलीस जाणीव सेवा संघाच्यावतीने संस्थापक अध्यक्ष रवी फडणीस यांच्या मार्गदर्शनानुसार दीप ज्योती नगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अजित पाटील कव्हेकर, सुजित बिरादार, ॲड. रामेश्वर सगरे, शिवमूर्ती झुंजे पाटील, शंकर साखरे, कार्यकारी अध्यक्ष अमित पोद्दार, पंकज भोळे, आकाश हडपत, महेश सोळुंके, रघुनाथ बंडगर, काका चौगुले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.