ऑटाे-दुचाकीची धडक; लातुरात दाेन गटांत राडा !

By राजकुमार जोंधळे | Updated: October 16, 2023 05:22 IST2023-10-16T05:22:19+5:302023-10-16T05:22:37+5:30

लातूर शहरातील सम्राट चाैक परिसरात एका ऑटाे आणि दुचाकीची धडक झाली. यावरून दाेन गटांत वाद झाला.

Auto-bicycle collision; clash in the right groups in Latur! | ऑटाे-दुचाकीची धडक; लातुरात दाेन गटांत राडा !

ऑटाे-दुचाकीची धडक; लातुरात दाेन गटांत राडा !

लातूर : ऑटाे आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर सम्राट चाैकात दाेन गट आमने-सामने आल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. रस्त्यावरच दाेन गटांत राडा झाल्याचे वृत्त असून, काही वेळ या परिसरात तणावाचे वातावरण हाेते.

लातूर शहरातील सम्राट चाैक परिसरात एका ऑटाे आणि दुचाकीची धडक झाली. यावरून दाेन गटांत वाद झाला. याच वादातून एक- एक करत दाेन्ही गटांतील तरुण आमनेसामने आले. यातून दाेन गटांत राडा झाल्याचे पाेलिसांनी सांगितले. अपघातात जखमी झालेल्यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, असे गांधी चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी सांगतले. मात्र, याबाबत रात्री उशिरापर्यंत काेणाचीही तक्रार आली नव्हती. तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पाेलिसांनी सांगितले.

वाहनाचा धक्का लागल्यावरून वाद...
ऑटाे आणि दुचाकीचा अपघात झाला असून, वाहनाचा धक्का लागल्यावरून हा वाद झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमचे पाेलिस घटनास्थळी गेले हाेते. दरम्यान, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, असे गांधी चाैक पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे म्हणाले.

Web Title: Auto-bicycle collision; clash in the right groups in Latur!

टॅग्स :Accidentअपघात