औराद मोठी, नरवटवाडी सर्वात लहान ग्रामपंचायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:26 IST2020-12-30T04:26:42+5:302020-12-30T04:26:42+5:30
सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक मंडळींनी गर्दी सुरू केली आहे. जिल्ह्यातील लक्षवेधी ग्रामपंचायत ही औराद शहाजानी येथील आहे. ...

औराद मोठी, नरवटवाडी सर्वात लहान ग्रामपंचायत
सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक मंडळींनी गर्दी सुरू केली आहे. जिल्ह्यातील लक्षवेधी ग्रामपंचायत ही औराद शहाजानी येथील आहे. या ग्रामपंचायतीला वार्षिक जकात अनुदानापोटी शासनाकडून २८ लाख रुपये मिळतात. येथे मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती, बाजारपेठ, डाळ उद्योग, ऑइल मिल असल्याने आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. गावात दरवेळची निवडणूक ही रस्ते, पाणी, वीज, नाली या मूलभूत प्रश्नांवर होत असते. याही निवडणुकीत हेच मुद्दे राहणार आहेत. दरवेळी येथे काँग्रेस आणि भाजप अशी दुरंगी लढत होत असते. मात्र, यावेळी तिरंगी लढतीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिसऱ्या आघाडीकडून सध्या बैठकांवर भर दिला जात आहे. त्यामुळे तालुक्याबरोबर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील सर्वात लहान ग्रामपंचायत ही अहमदपूर तालुक्यातील नरवटवाडी येथील आहे. दहा वर्षांपासून महिलाराज असून, प्रभाग २ मधील उमेदवार बिनविरोध निघतो. गावात गेल्या काही वर्षांपासून दुरंगी लढत होते. याही वेळी अशाच लढतीची चिन्हे दिसून येत आहेत.