अल्पवयीन पीडित मुलीवर केला अत्याचार; त्यांनतर तिच्या दोन बहिणींचेही केले लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 08:20 IST2021-09-03T08:19:43+5:302021-09-03T08:20:03+5:30

लातूर शहरातील प्रकार

Atrocities committed on a minor victim girl; She later sexually abused her two sisters in latur pdc | अल्पवयीन पीडित मुलीवर केला अत्याचार; त्यांनतर तिच्या दोन बहिणींचेही केले लैंगिक शोषण

अल्पवयीन पीडित मुलीवर केला अत्याचार; त्यांनतर तिच्या दोन बहिणींचेही केले लैंगिक शोषण

लातूर : विवाहित महिलेसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत तिच्या तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी लातूरच्या विशेष सत्र न्यायालयाने आरोपीस दहा वर्षांचा कारावास आणि १२०० रुपये दंडाची शिक्षा विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी.सी. कांबळे यांनी सुनावली आहे.

लातूर शहरातील गांधी चाैक पोलीस ठाण्यात १८ नोव्हेंबर २०१७ रोजी अल्पवयीन पीडित मुलीने तक्रार दाखल केली होती. तिची आई व तिच्या आत्याचा नवरा चंद्रकांत वागलगावे हे दहा वर्षांपासून लग्न न करताच स्वखुशीने सोबत राहत होते. त्याचदरम्यान आरोपी चंद्रकांतने पीडितेवर अत्याचार केला. ही बाब कोणाला सांगितल्यास सर्वांना जीवे मारीन अशी त्याने धमकी दिल्याने पीडिता गप्प राहिली. त्यानंतर त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने पीडितेवर अत्याचार केला.

काही दिवसांनी पीडितेच्या दोन लहान बहिणींसोबतही त्याने अत्याचार केल्याचे उघड झाल्याने पीडितेने गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयाने ८ साक्षीदार तपासले. यातील पीडितेची आई, दोन बहिणीची साक्ष, पीडित ही अल्पवयीन असल्याबाबतचा पुरावा साक्षी पुराव्यादरम्यान ग्राह्य धरून आरोपीस शिक्षा ठोठावली आहे.

Web Title: Atrocities committed on a minor victim girl; She later sexually abused her two sisters in latur pdc