उदगीर तालुक्यातील हाळी येथे मंदिरातील दान पेटी फोडली

By संदीप शिंदे | Updated: June 28, 2023 20:05 IST2023-06-28T20:02:32+5:302023-06-28T20:05:07+5:30

भक्त मंडळी सकाळी दर्शनासाठी गेल्यानंतर मंदिराच्या दाराचे कुलूप तुटलेले व दान पेटी गायब असल्याचे दिसून आले.

At Hali in Udgir taluka, the temple's donation box was broken | उदगीर तालुक्यातील हाळी येथे मंदिरातील दान पेटी फोडली

उदगीर तालुक्यातील हाळी येथे मंदिरातील दान पेटी फोडली

हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी येथील मारोती मंदिराचा दरवाज्याचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून, मंदिरातील दानपेटी मधील १२ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून दानपेटी मंदिराच्या लगत असलेल्या शेतात टाकून फरार झाल्याची घटना २६ जुनच्या रात्री घडली. याबाबत रमण माने यांच्या फिर्यादीवरून वाढवणा बु. ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

पोलिसांनी सांगितले २६ जुन रोजी सायंकाळी हरिपाठ झाल्यानंतर मंदिर बंद करण्यात आले. दरम्यान काही भक्त मंडळी सकाळी दर्शनासाठी गेल्यानंतर मंदिराच्या दाराचे कुलूप तुटलेले व दान पेटी गायब असल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्यांनी मंदीरातील दानपेटी उचलून नेऊन व त्यातील पैसे काढून रिकामी दानपेटी लगतच्या शेतात फेकून दिल्याचे नागरिकांना आढळून आले. दानपेटी मधील अंदाजे १२ हजार रुपये चोरट्याने लंपास केले. याबाबत वाढवणा बु. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: At Hali in Udgir taluka, the temple's donation box was broken