प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:15 IST2021-06-25T04:15:40+5:302021-06-25T04:15:40+5:30
जळकोट : तालुक्यातील व शहरातील प्रलंबित कामे तत्काळ करुन शहराचा पाणीपुरवठा आठ दिवसात सुरळीत करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी ...

प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावा
जळकोट : तालुक्यातील व शहरातील प्रलंबित कामे तत्काळ करुन शहराचा पाणीपुरवठा आठ दिवसात सुरळीत करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी गुरूवारी दिले.
येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात नगर पंचायत, तहसील विभाग, महावितरण, महामार्ग रस्त्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेंगशेट्टी यांनी शहरातील पाण्याच्या टाकीवरील पाणी फिल्टर, पाईपलाईन, मुख्य रस्त्यावरील राेहित्र इतरत्र हलवून होणारी अडचण दूर करावी, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच नगर पंचायतीकडून आढावा घेतला. संबंधित कामे तत्काळ मार्गी लावावीत, अशा सूचना केल्या. तहसीलच्या प्रत्येक विभागाचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तत्काळ करुन जनतेची गैरसौय होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
दरम्यान, वृक्ष लागवड व त्यांची जोपासना करण्यासाठी प्रयत्न करावे, नगर पंचायतीने शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी, शहरातील कचरा डेपो, लिंगायत स्मशानभूमी, वाॅटर फिल्टर आदी कामे लवकर मार्गी लागावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याचे आदेश दिले.
या बैठकीला तहसीलदार संदीप कुलकर्णी, नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी शोभा शिंदे, महावितरणचे भोसले, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.