तिसरी लाट रोखण्यासाठी बालरोग तज्ज्ञांची फौज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:15 IST2021-05-28T04:15:42+5:302021-05-28T04:15:42+5:30
उपचारासाठी प्रोटोकॉल उपचाराचा प्रोटोकॉल तयार करणे, संभाव्य रुग्णांची संख्या लक्षात घेऊन बेडची व्यवस्था करणे, आवश्यक औषधी व उपकरणे या ...

तिसरी लाट रोखण्यासाठी बालरोग तज्ज्ञांची फौज
उपचारासाठी प्रोटोकॉल
उपचाराचा प्रोटोकॉल तयार करणे, संभाव्य रुग्णांची संख्या लक्षात घेऊन बेडची व्यवस्था करणे, आवश्यक औषधी व उपकरणे या विषयी मार्गदर्शन करणे, संदर्भ सेवेविषयी धोरण निश्चित करणे, ग्रामीण व शहरी भागातील शासकीय व अशासकीय क्षेत्रातील मनुष्यबळाचे प्रशिक्षण निश्चित करणे, ऑक्सिजन किती लागणार, या संबंधी नियोजन करणे आदीबाबत तयारी केली जात आहे.
उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बाल रुग्णांच्या उपचारासाठी सोय केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयातून नियोजन केले जाणार आहे. शासकीय २५ बालरोग तज्ज्ञांची मदत यासाठी घेतली जाणार आहे.
जिल्ह्यात तिसरी लाट आली तर यंत्रणा ती रोखण्यासाठी सक्षम केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार टास्क फोर्स तयार करण्यात आल्या असून, त्याच्या बैठका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्या आहेत. उपलब्ध बेड आणि क्षमता वाढविणे, औषधांचा पुरवठा या अनुषंगाने तयारी करण्यात आली आहे. खासगी दीडशे बाल रुग्णालये आहेत. त्यांची बेड क्षमता वाढविण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. - डॉ.एल.एस. देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक