रेणापूर तालुक्यातील ६०५ उमेदवारांचे अर्ज वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:14 IST2021-01-01T04:14:31+5:302021-01-01T04:14:31+5:30
रेणापूर तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. २८ ग्रामपंचायतींमध्ये २२८ सदस्यांची निवड केली जाणार ...

रेणापूर तालुक्यातील ६०५ उमेदवारांचे अर्ज वैध
रेणापूर तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. २८ ग्रामपंचायतींमध्ये २२८ सदस्यांची निवड केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी तालुक्यातून एकही अर्ज दाखल झाला नव्हता. २८ डिसेंबर राेजी ३३, २९ डिसेंबर राेजी १५७, तर ३० डिसेंबरअखेर ६०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले हाेते. ग्रामपंचायतनिहाय दाखल अर्ज असे : खरोळा - ३९, वाला - २६, तळणी - २४, सिंधगाव - २७, माकेगाव - २०, फरदपूर - २४, बीटरगाव - ३३, भंडारवाडी - २५, मुसळेवाडी - २३, मोरवड - २१, दवणगाव - १८, व्हटी - २३, फावडेवाडी - ११, मोहगाव - २०, दिवेगाव - १७, गव्हाण - २२, खानापूर - १३, पळशी - १७, कुंभारवाडी - ३०, अiदलगाव - १२, बावची - १९, तत्तापूर - २७, पाथरवाडी - १५, आनंदवाडी - १८, वंजारवाडी - १७, सारोळा - १८, कुंभारी - २३, खलंग्री - २५ असे एकूण ६०७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राहुल पाटील, निवडणूक नायब तहसीलदार गोविंद येरमे यांनी दिली.