कार-मोटारसायकलच्या अपघातातील दुसऱ्या तरुणाचीही प्राणज्योत मालवली 

By राजकुमार जोंधळे | Updated: June 9, 2025 19:40 IST2025-06-09T19:40:08+5:302025-06-09T19:40:51+5:30

- राजकुमार जाेंधळे लातूर : शहरातील अंबाजोगाई रोडवरील कॉक्सिट महाविद्यालयासमोर रविवारी पहाटे मोटारसायकल व इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला ...

Another youth also lost his life in a car-motorcycle accident. | कार-मोटारसायकलच्या अपघातातील दुसऱ्या तरुणाचीही प्राणज्योत मालवली 

कार-मोटारसायकलच्या अपघातातील दुसऱ्या तरुणाचीही प्राणज्योत मालवली 

- राजकुमार जाेंधळे

लातूर : शहरातील अंबाजोगाई रोडवरील कॉक्सिट महाविद्यालयासमोर रविवारी पहाटे मोटारसायकल व इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातातील गंभीर जखमी असलेल्या दुसऱ्या तरुणाचीही उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली.

जिम करून अंबाजोगाई रोडने शिवाजी चौकाकडे येत असताना रविवारी पहाटे नहूष राहुल पाटील व नरेंद्र अर्जुन जाधव यांच्या मोटारसायकल व इनोव्हा कारची टक्कर झाली होती. या भीषण अपघातात नहूष पाटील गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले. रविवारीच त्यांच्या पार्थिवावर सास्तूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तर नरेंद्र जाधव यांचे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी रात्री उशिरा निधन झाले. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी लातूर तालुक्यातील दिंडेगाव येथे मूळ गावी शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नरेंद्र जाधव कुशल अभियंता....
नरेंद्र जाधव हे इंजिनिअर होते. कुशल स्थापत्य अभियंता म्हणून ओळख होत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. सामाजिक आणि राजकीय कार्यातही त्यांचा सहभाग होता. शिवसेनेचे युवा पदाधिकारी म्हणून त्यांच्या राजकीय कार्याला सुरुवात झाली होती.

Web Title: Another youth also lost his life in a car-motorcycle accident.

टॅग्स :Accidentअपघात