औसा तालुक्यातील नागरसोगा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचे विरंगुळा केंद्राचे उद्घाटन व बिहार पॅटर्न वृक्षलागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सीईओ अभिनव गोयल बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह साळुंखे, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, सतीश पाटील, आरोग्य अधिकारी आर.आर. शेख, उपअभियंता कसबे, अशोक मादळे, बालाजी तेलंग, बालाजी पोतदार, पंस सदस्य दीपक चाबूकस्वार, सरपंच सरोजाताई सूर्यवंशी, उपसरपंच बंडू मसलकर, तलाठी रोहित धावडे, व्ही.सी. चौधरी, भास्कर सूर्यवंशी, दिलीप पाटील, तंटामुक्त अध्यक्ष राहुल पाटील, शिवाजी फावडे, चंद्रकांत जवादे, अभियंता संदीप सोनकांबळे, अभियंता कपाळे यांची उपस्थिती होती. सीईओ गोयल म्हणाले, पर्यावरणाची समस्या गंभीर होत चालली आहे. त्यामुळे वृक्षलागवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरुण पिढीकडे नवीन संकल्पना व ऊर्जा आहे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन व युवापिढीची ताकद एकत्र आली तर कुठलेच काम अशक्य नाही. येणाऱ्या पिढीचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
बिहार पॅटर्न पद्धतीने वृक्षलागवड...
विरंगुळा केंद्रासाठी शासनाकडून खुर्ची, टेबल व दुरचित्रवाणीसाठी ५० हजार रुपयांची मदत देण्यात येईल. नागरसोगा ग्रामस्थांनी ‘माझे गाव, सुंदर गाव’ यात सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवावा, अशी अपेक्षा सीईओ अभिनव गोयल यांनी व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप आणि बिहार पॅटर्न वृक्षलागवड करण्यात आली.