दारूमुळे वादाची ठिणगी पडली; मोठ्याने लहान भावास चाकूने भोसकून संपवले
By राजकुमार जोंधळे | Updated: October 10, 2022 17:10 IST2022-10-10T17:09:49+5:302022-10-10T17:10:48+5:30
लातुरातील खाडगाव राेड परिसरातील घटना

दारूमुळे वादाची ठिणगी पडली; मोठ्याने लहान भावास चाकूने भोसकून संपवले
लातूर : किरकोळ वादातून सख्ख्या भावाने आपल्या लहान भावाचा पाेटात चाकू भाेसकून खून केल्याची घटना लातुरातील खाडगाव राेड परिसरात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आईने दिलेल्या तक्रारीवरून माेठ्या भावाविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लक्ष्मी सुभाष आलाकुंन्टे (वय ६० रा. बाबा नगर, खाडगाव राेड, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मयत मुलगा नितीन उर्फ राेहित सुभाष आलाकुंन्टे याचे त्याच्या पत्नीसाेबत पटत नसल्याने त्याला ती साेडून गेल्या तीन वर्षांपासून पिंपरी चिंचवड परिसरात राहत आहे. दरम्यान, नितीन हा नेहमी दारु पिवून घरातील सर्वांसाेबत भांडण करत हाेता. गेल्या एक महिन्यापूर्वी लहान मुलगा नितीन आणि माेठा मुलगा राहूल यांचे कडाक्याचे भांडण झाले हाेते. तेंव्हापासून त्यांचे आपसामध्ये पटत नव्हते. याच कारणावरुन झालेल्या किरकाेळ वादातून ८ ऑक्टाेंबर राेजी माेठा मुलगा राहुले याने लहान मुलगा नितीन यांच्या पाेटावर, खांद्यावर चाकुने वार करुन खून केला.
याबाबत रविवारी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन राहुल सुभाष आलाकुंन्टे यांच्याविराेधात गुरनं. ५६९ / २०२२ कलम ३०२ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलीस निरीक्षक संजिवन मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस उपनिरीक्षक एस.एस. कराड करत आहेत.