अहमदपूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांचा पालिकेवर हलगी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 17:04 IST2018-12-12T17:04:04+5:302018-12-12T17:04:17+5:30
संतप्त नागरिक आणि साजीदभाई मित्रमंडळाच्या वतीने नगरपालिकेवर हलगी मोर्चा काढण्यात आला़

अहमदपूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांचा पालिकेवर हलगी मोर्चा
अहमदपूर (लातूर ) : शहरातील प्रभाग क्ऱ १ मधील नळाला दीड महिन्यांपासून पाणी न आल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे़ त्यामुळे प्रभागातील संतप्त नागरिक आणि साजीदभाई मित्रमंडळाच्या वतीने बुधवारी नगरपालिकेवर हलगी मोर्चा काढण्यात आला़
अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी धरणात मुबलक पाणी असूनही पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे. नळाला ३० दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ पाण्यासाठी नागरिकांतून संताप व्यक्त होत असतानाही नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे़ याशिवाय, शहरातील काही भागांत मूलभूत सुविधाही पुरविल्या जात नाहीत. मुलभूत सुविधांसाठी साजीदभाई मित्र मंडळाच्या वतीने आंदोलने करण्यात आली. मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले़ पालिकेने तात्काळ पाणी पुरवठ्याचे नियोजन करून चार दिवसांतून एकदा पाणी पुरवठा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली़
यावेळी मित्र मंडळाचे शहर उपाध्यक्ष जाबेर पठाण, अजगर शेख, समशाद पठाण, शादुल तांबोळी, फारुख सय्यद, जिलानी मनियार, जगदीश वाघमारे, जावेद शेख, साहिल शेख, अझहर शेख, शादुल पठाण, गौस शेख, हाजी शेख, कलीम शेख, हमीद शेख, उस्मान शेख, चाँद शेख, बाबा शेख यांच्यासह प्रभागातील नागरिकांची उपस्थिती होती़