शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!

By राजकुमार जोंधळे | Updated: April 25, 2025 23:48 IST

लातुरातील तीन कुटुंब सुखरूप : पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...

राजकुमार जाेंधळे / लातूर : काश्मिरात आणखी एक दिवस मुक्काम करुन वैष्णवदेवीला जाण्याचा प्लॅन हाेता. मात्र, तिकीट न मिळाल्याने २१ एप्रिल राेजी आम्ही पहलगाम साेडले आणि परतीच्या प्रवासाला लागलाे. दुसऱ्या दिवशी २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यातून धडकल्या. त्यावेळी अंगावर काटा उभा ठाकला. अवघ्या काही तासांपूर्वीच आपण हा परिसर साेडला आणि अनर्थ टळला, अशीच भावना लातुरातील तीनही कुटुंबांनी व्यक्त केली.

१५ एप्रिल रोजी पहाटे पुणे येथून दिल्ली आणि दिल्ली विमानतळावरून श्रीनगर असा प्रवास करत लातुरातील गणेश गोले, गंगाधर करीमुंगी आणि रामेश्वरी कलशेट्टी हे मुलांना सुटी असल्याने परिवारासह एका खाजगी टुरिस्ट कंपनीच्या पॅकेजमधून सहा दिवसांसाठी काश्मीरला पोहोचले. त्यात श्रीनगर येथे दाेन दिवस, हाउस बोट येथे एक दिवस आणि पहलगाम येथे १९ ते २१ एप्रिल असे तीन दिवस हाेते. पहलगाम येथे निसर्गाचा आनंद घेत फाेटेही काढले. भाेजनाचा आनंद घेत डोंगर-दऱ्या पाहत होताे. शिवाय, २१ एप्रिल राेजी तारखेला ‘बेताब व्हॅली’ येथून घोड्यावरून पहाडी परिसरात भटकंती करायचं ठरलं हाेतं. मात्र, सगळ्यांचं मत जुळले नाही. त्यामुळे घोड्यावरून बेताब व्हॅली पाहण्याचा निर्णय रद्द झाला. जेथे हा भ्याड हल्ला झाला त्याच ठिकाणचा परिसर...त्यानंतर साइड सिनरी पाहत आम्ही २१ एप्रिलला पहलगाममधून श्रीनगरला परतलाे.

मध्यरात्रीचा प्रवास करून आम्ही पुणे येथे पोहोचलो. तेथे पोहोचल्यानंतर समजलं की, पहलगाम येथे दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला झाला. त्यावेळी वाटले की आपण तेथून अवघ्या काही तासांपूर्वी परतलाे. आणखी एक दिवसाचा मुक्काम पहलगाममध्ये करून वैष्णवीदेवीला जाण्याचा प्लॅन केला असता तर आपल्यावरही हा प्रसंग बेतला असता, असेच वाटू लागले. मात्र, वैष्णवदेवीचे तिकीट न मिळाल्याने २१ तारखेलाच आम्ही परतीच्या प्रवासाला लागलाे आणि पुण्यात दाखल झालाे, अशी माहिती गणेश गाेले यांनी दिली.

पहलगाम प्रवासामध्ये हाेती सहा लहान मुले...२२ एप्रिल राेजी पहलगामध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचे वृत्त समजले. त्यानंतर तेथील परिस्थिती वृत्त वाहिन्यांवरून पाहत असताना अंगावर शहारा आला. या वृत्ताने पहिल्यांदा जबर धक्काच बसला. तीनही कुटुंबातील सदस्य बेचैन झाले. सहा लहान मुलांसह हे तीनही कुटुंब पुणे येथून लातुरात सुखरूप परतल्याने जीव भांड्यात पडला.

टॅग्स :TerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला