शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, महिनाभराच्या दीर्घ खंडानंतर लातूर जिल्ह्यात वरुणराजाची हजेरी

By हरी मोकाशे | Updated: September 4, 2023 19:35 IST

जलसाठा वाढण्यासाठी दमदार पावसाची गरज

लातूर : तब्बल महिनाभराच्या दीर्घ खंडानंतर जिल्ह्यात रविवारी रात्री व सोमवारी पहाटेच्या सुमारास वरुणराजाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. पावसाने पिकांना तूर्तास जीवदान मिळाले आहे. मात्र, प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी सर्वदूर व दमदार पावसाची गरज आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १६.०१ मिमी पाऊस झाला आहे.

यंदा जिल्ह्यात पाऊस उशिरा सुरू झाल्याने खरिपाच्या पेरण्याही विलंबाने झाल्या. जिल्ह्यात ९८ टक्के क्षेत्रावर पेरा झाला. दरम्यान, पिकांपुरता रिमझिम पाऊस झाल्याने सोयाबीनसह इतर पिके चांगली बहरली होती. मात्र, जुलैअखेरपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे फुलोऱ्याच्या अवस्थेतील सोयाबीनची फुलगळती झाली. शिवाय, वाढही खुंटली. दरम्यान, पावसाने ताण कायम ठेवल्याने हलक्या व मध्यम जमिनीवरील करपून गेली, तर चांगल्या जमिनीवरील पिकांना शेतकऱ्यांनी पाणी दिल्याने तग धरून राहिली. मात्र, सोयाबीनच्या अपेक्षित उत्पादनात जवळपास ६० ते ८० टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.

तब्बल महिनाभरानंतर जिल्ह्यातील सर्व भागात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आशा उंचावल्या आहेत. खरिपातील सोयाबीनला फटका बसला असला तरी किमान पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, अशी आशा आहे. त्यामुळे दमदार पावसाकडे लक्ष लागून आहे.

आतापर्यंत सरासरी ३५९.३ मिमी पाऊस...

तालुका - २४ तासांतील पाऊस - आतापर्यंतचा पाऊसलातूर - २०.४ - ३३५.३

औसा - १७.४ - २५१.२अहमदपूर - १३.५ - ३५१.०

निलंगा - १६.२ - ३४१.७उदगीर - ८.९ - ४८३.४

चाकूर - २२.० - ३१२.६रेणापूर - ११.७ - २८०.९

देवणी - १२.४ - ५२८.६शिरुर अनं.- २४.३ - ३८४.०

जळकोट - ९.९ - ४२४.४एकूण - १६.१ - ३५९.३

जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण...

दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हवेत थंड गारवा जाणवत होता. जिल्ह्यातील येरोळ, देवणी, निटूर, खरोसासह काही भागात मध्यम व रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे खरिपातील पिकांना तात्पुरते जीवदान मिळाले आहे. मात्र, विहिरी, तलावातील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची अद्यापही गरज आहे. त्यामुळे पावसाकडे नजरा लागून आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत २२१ मिमीची तूट...गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५८०.५ मिमी पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत सरासरी ३५९.३ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास २२१.२ मिमी पावसाची तूट आहे. जुलैअखेरपासून पावसाने ताण दिल्याने उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. आता वातावरणात बदल झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीlaturलातूरRainपाऊस