चार मुलींचे अपहरण; पाेलिसांनी लावला छडा
By राजकुमार जोंधळे | Updated: June 19, 2024 22:11 IST2024-06-19T22:10:51+5:302024-06-19T22:11:00+5:30
आठ दिवसात शाेध : पनवेल, धाराशिवमधून घेतले ताब्यात

चार मुलींचे अपहरण; पाेलिसांनी लावला छडा
राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण केलेल्या तीन आणि हरवलेल्या एका मुलीचा पाेलिसांनी आठ दिवसात शाेध घेत वेगवेगळ्या शहरातून त्यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यात अपहरण आणि हरवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले हाेते. जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी या अपहरण केलेल्या, हरवलेल्या मुलींचा शाेध घेण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार गत आठ दिवसांपासून स्थानिक पाेलिस आणि एएसटीयूच्या पथकाने समांत शाेध माेहीम हाती घेतली. गत दाेन वर्षांपासून जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यातील मुलींचा शोध घेण्यात आला. या मुली पनवेल-नवी मुंबई, उमरगा (जि.धाराशिव), नळेगाव (जि.लातूर) आणि कसबे तडवळे (जि. धाराशिव) येथे असल्याचा सुगावा लागला. पाेलिसांनी त्या-त्या ठिकाणावर छापा मारुन मुलींना ताब्यात घेतले. याप्रकरणी आराेपींना पाेलिस पथकाने अटक केली आहे.
ही कारवाई पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, उपाधीक्षक गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपाेनि. दयानंद पाटील, पोउपनि. सूर्यवंशी, सदानंद योगी, प्रकाश जाधव, मणियार, वंगे, लता गिरी यांच्या पथकाने केली.