तरुणाची राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या, रेणापूर येथील घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: October 8, 2023 06:41 IST2023-10-08T06:41:03+5:302023-10-08T06:41:27+5:30

सोमनाथ धनंजय खोबरे (वय २४) असे मृत तरुण व्यापाऱ्याचे नाव आहे...

A young man committed suicide by hanging himself in his residence, an incident in Renapur | तरुणाची राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या, रेणापूर येथील घटना

प्रतिकात्मक फोटो

लातूर : येथील २४ वर्षीय व्यापाऱ्याने राहत्या घरात छताच्या फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात सायंकाळी अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. सोमनाथ धनंजय खोबरे (वय २४) असे मयत तरुण व्यापाऱ्याचे नाव आहे.

पाेलिसांनी सांगितले, सोमनाथ धनंजय खोबरे (वय २४, रा. संभाजीनगर, रेणापूर) हा अविवाहित असून, तो अरुणा जनरल स्टोअर्स ॲन्ड सिजन शाॅपी नावाने दुकान चालवित हाेता. दरम्यान, सोमनाथ खोबरे याने राहत्या घरातील फॅनला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सायंकाळी सहा वाजता रेणापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात रविकांत प्रकाश खोबरे यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक एस.एस. मदने, किरण गंभीरे करीत आहेत. घटनेचे वृत्त कळताच रेणापुरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली हाेती.
 

Web Title: A young man committed suicide by hanging himself in his residence, an incident in Renapur