निलंगा तालुक्यातील लांबोट्यात वीज पडून एक महिला ठार

By संदीप शिंदे | Updated: September 28, 2022 20:30 IST2022-09-28T20:30:35+5:302022-09-28T20:30:43+5:30

कलांडी येथे व्यंकट राम सुर्यवंशी यांचा बैल वीज पडल्याने ठार झाला आहे.

A woman was killed by lightning strike in Lambota of Nilanga taluk | निलंगा तालुक्यातील लांबोट्यात वीज पडून एक महिला ठार

निलंगा तालुक्यातील लांबोट्यात वीज पडून एक महिला ठार

निलंगा (जि.लातूर) : निलंगा तालुक्यात बुधवारी सायंकाळी पाच वाजेदरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसात वीज पडून लांंबोटा येथील उषाबाई लक्ष्मण आवटे (४५) या महिलेचा मृत्यू झाला. त्या म्हैस घेऊन गावाकडे येत होत्या. तसेच कलांडी येथे व्यंकट राम सुर्यवंशी यांचा बैल वीज पडल्याने ठार झाला आहे.

मयत महिलेचे प्रेत निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उषाबाई आवटे यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासु, सासरे असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेची निलंगा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: A woman was killed by lightning strike in Lambota of Nilanga taluk