आठवडाभरानंतर निघाला सौदा; सोयाबीन आवक अन् दर स्थिर!

By हरी मोकाशे | Published: April 1, 2024 05:44 PM2024-04-01T17:44:13+5:302024-04-01T17:44:25+5:30

बाजार समिती : सर्वसाधारण भाव ४ हजार ५५० रुपये

A week later, the deal was struck; Soybean arrival and price stable! | आठवडाभरानंतर निघाला सौदा; सोयाबीन आवक अन् दर स्थिर!

आठवडाभरानंतर निघाला सौदा; सोयाबीन आवक अन् दर स्थिर!

लातूर : आठवडाभराच्या सुट्टीनंतर सोमवारी शहरातील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाचा सौदा निघाला. शेतीमालाची आवक अन् दर स्थिर असल्याचे पहावयास मिळाले. नगदी पीक असलेल्या सोयाबीनला ४ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

गत खरीपात अल्प पर्जन्यमानामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे आगामी काळात चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा लागून होती. परंतु, सातत्याने दरात घसरण होत आहे. आधारभूत किंमतीपेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. सध्या रबी हंगामातील हरभऱ्याच्या राशी झाल्या असून बाजारात बऱ्यापैकी आवक होत आहे. दरम्यान, होळीनिमित्ताने २४ मार्च रोजी बाजार समितीस सुट्टी होती. २५ रोजी धुलीवंदनाची सुटी राहिली तर २६ ते २८ मार्च दरम्यान, आडत, व्यापारी आणि हमाल मापाडींनी एकत्रित येऊन सुटी घेतली. २९ रोजी गुड फ्रायडे, ३० रोजी रंगपंचमीची तर ३१ मार्च रोजी रविवारी सुटी राहिली. त्यामुळे सोमवारी बाजारपेठ पूर्ववत सुरु झाली.

शेतमाल - आवक - साधारण दर
गहू - १५१ - २९००
हायब्रीड - ५९ - २३००
ज्वारी - ४६४ - ३४००
पिवळी - १५३ - ३९००
हरभरा - ६१६२ - ५६००
तूर - २३१८ - १०३००
करडई - २६६ - ४३१०
सोयाबीन - १३७९७ - ४५५०
चिंच - ८८३ - ९०००
राजमा - ११३ - ९१००

Web Title: A week later, the deal was struck; Soybean arrival and price stable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.