पोलिसांची गस्त आली अन् चोरट्यांची बार फोडण्याची नशा उतरली

By हरी मोकाशे | Updated: March 17, 2023 17:53 IST2023-03-17T17:52:25+5:302023-03-17T17:53:31+5:30

कर्तव्यावरील होमगार्ड रामेश्वर मुगळे व राजनाथ सरवदे यांनी चोरट्यांना पाहताच पोलिसांना दिली माहिती

A police patrol came and the thieves run away from Bar | पोलिसांची गस्त आली अन् चोरट्यांची बार फोडण्याची नशा उतरली

पोलिसांची गस्त आली अन् चोरट्यांची बार फोडण्याची नशा उतरली

किल्लारी : लातूर- गुलबर्गा मार्गावरील किल्लारी पाटीवरील एका बारच्या पाठीमागील बाजूच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करण्याच्या तयारी असलेल्या चोरट्यांना गस्तीवरील पोलिसांनी हटकले. हे पाहून चोरट्यांनी जवळच्या शेतातून पोबारा केल्याची गुरुवारी मध्यरात्री घडली.

औसा तालुक्यातील किल्लारी पाटीवर गौरीशंकर बालकुंदे यांचे हॉटेल बार आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी गुरुवारी रात्री बार बंद केला होता. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बारच्या चॅनल गेटचे कुलूप तोडले आणि चोरी करण्याच्या उद्देशाने आतमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते. तेव्हा कर्तव्यावरील होमगार्ड रामेश्वर मुगळे व राजनाथ सरवदे यांना बारच्या बाजूस तीन अज्ञात चोरटे बसल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी ही माहिती किल्लारी पोलिस ठाण्याचे सपोनि. नाना लिंगे यांना दिली. त्यांनी तात्काळ पेट्रोलिंगवर असलेले एएसआय किसन मरडे यांना ही माहिती दिली. मरडे हे विनाविलंब घटनास्थळी पोहोचले आणि हटकले असता चोरट्यांनी तेथून पळ काढला. राञी वेळ असल्यामुळे चोरटे शेतातून पसार झाले. पोलिसांनी शोध घेतला, मात्र चोरटे सापडले नाहीत.त्यानंतर बारचे मालक गौरीशंकर बालकुंदे यांना बोलावून माहिती देण्यात आली. यावेळी बालकुंदे यांनी पोलिस व होमगार्डचा सत्कार केला.

Web Title: A police patrol came and the thieves run away from Bar