अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

By संदीप शिंदे | Updated: September 15, 2023 17:50 IST2023-09-15T17:50:19+5:302023-09-15T17:50:34+5:30

अज्ञात वाहनाने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली.

A motorcyclist died on the spot in a collision with an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

लातूर: अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी दगडवाडीजवळ घडली. शेख उस्मान मेहबूबसाब असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.  

पोलिसांनी सांगितले, अंबाजोगाई तालुक्यातील धसवाडी येथील रहिवासी शेख उस्मान मेहबूबसाब (वय ३९, ह. मु. किनगाव) हे किनगावहून आपल्या स्वतःच्या (एमएच २४ बीई ८४६६) क्रमांकाच्या दुचाकीने बीड जिल्ह्यातील धर्मापुरीकडे खासगी कामासाठी निघाले होते. शुक्रवारी सकाळी दगडवाडीजवळ पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

याप्रकरणी किनगाव पोलिसात फिर्यादी अमीरसाब मैनोद्दीन शेख यांच्या तक्रारीवरुन अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे करीत आहेत. शेख यांचे किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.

Web Title: A motorcyclist died on the spot in a collision with an unknown vehicle