नांदेड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचे चाकूर येथून केले अपहरण
By राजकुमार जोंधळे | Updated: July 27, 2022 20:49 IST2022-07-27T20:48:33+5:302022-07-27T20:49:05+5:30
नांदेड जिल्ह्यातील एक कुटुंब चाकूर तालुक्यातील शेतात सध्याला वास्तव्याला आहे.

नांदेड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचे चाकूर येथून केले अपहरण
किनगाव (जि. लातूर) : एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची घटना चाकूर तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात एकाविरुध्द बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, नांदेड जिल्ह्यातील एक कुटुंब चाकूर तालुक्यातील शेतात सध्याला वास्तव्याला आहे. दरम्यान, औसा तालुक्यातील सेलू येथील आरोपीने एका ११ वर्षीय मुलीला आमिष दाखवून पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीविरुध्द बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.