लातुरात अल्पवयीन मुलगा घेऊन फिरत होता तलवार, पोलिसांनी घेतले ताब्यात

By राजकुमार जोंधळे | Updated: August 16, 2022 20:18 IST2022-08-16T20:18:51+5:302022-08-16T20:18:51+5:30

विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा

A minor boy was walking around with a sword in Latur, the police took him into custody | लातुरात अल्पवयीन मुलगा घेऊन फिरत होता तलवार, पोलिसांनी घेतले ताब्यात

लातुरात अल्पवयीन मुलगा घेऊन फिरत होता तलवार, पोलिसांनी घेतले ताब्यात

लातूर : शहरातील अंजली नगर भागात एक अल्पवयीन मुलगा हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेत तलवार जप्त केली. दरम्यान, याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, लातुरातील अंजली नगरात वास्तव्याला असलेल्या एका अल्पवयीन मुलाकडे तलवार असून, तो हातात घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. या माहितीच्या आधारे विवेकानंद चौक ठाण्याच्या पोलिसांनी मंगळवारी सकाळी १०.३० वाजता अंजली नगरातून त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. दरम्यान, त्याची झाडाझडती घेत अधिक चैकशी केली असता, त्याच्याकडे पितळी मूठ असलेली तलवार आढळून आली. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, डीवायएसपी जितेंद्र जगदाळे, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. भाऊसाहेब खांदारे, उदय सावंत, पोउपनि. महेश गळगटे, विलास फुलारी, संजय कांबळे, मुन्ना पठाण, बळीराम देमगुंडे, उस्मान मोमीन, रमेश नामदास, पद्माकर सुरवसे, दिनेश हवा, राम सोनहिवरे, मुन्ना नलवाड, नारायण शिंदे, दीपक बोदर यांच्या पथकाने केली.

Web Title: A minor boy was walking around with a sword in Latur, the police took him into custody