लग्नाचे अमिष दाखवून २० वर्षीय युवतीवर अत्याचार

By हरी मोकाशे | Updated: March 1, 2023 17:33 IST2023-03-01T17:33:23+5:302023-03-01T17:33:46+5:30

या प्रकरणी उदगीर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

A 20-year-old girl was assaulted by luring her into marriage | लग्नाचे अमिष दाखवून २० वर्षीय युवतीवर अत्याचार

लग्नाचे अमिष दाखवून २० वर्षीय युवतीवर अत्याचार

उदगीर : जळकोट तालुक्यातील एका २० वर्षीय युवतीस लग्नाचे आमिष दाखवून दहा महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिडित युवतीच्या फिर्यादीवरुन बुधवारी पहाटे उदगीर शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीर शहर पोलिसांनी सांगितले, आरोपी गौरव कुणके (रा. जळकोट) याने जळकोट तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय युवतीस लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने एप्रिल २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत विविध ठिकाणी युवतीस नेऊन अत्याचार केले. तसेच मारहाणही केली. याप्रकरणी पीडित युवतीच्या फिर्यादीवरुन बुधवारी पहाटे उदगीर शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुध्द विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक कविता जाधव ह्या करीत आहेत.

Web Title: A 20-year-old girl was assaulted by luring her into marriage