८० वर्षीय आजीबाईंनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:19 IST2021-05-13T04:19:31+5:302021-05-13T04:19:31+5:30
तालुक्यातील मौजे धनेगाव येथील नागीणबाई गिरी (८०) यांना सर्दी, ताप, खोकला, धाप अशी लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्यांची कोरोना ...

८० वर्षीय आजीबाईंनी केली कोरोनावर मात
तालुक्यातील मौजे धनेगाव येथील नागीणबाई गिरी (८०) यांना सर्दी, ताप, खोकला, धाप अशी लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. तेव्हा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, त्यांच्या शिक्षक मुलासही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. उपचारासाठी त्यांनी खासगी दवाखान्यांचा शोध घेतला; परंतु तिथे खाटा उपलब्ध नसल्याने दाखल होता आले नाही. अखेर त्यांना देवणीच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला ऑक्सिजनचे प्रमाण ८७ होते.
हे पाहून कोरोना केअर सेंटरमधील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी तत्काळ उपचार केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतले. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आणि तेथील सुविधांमुळे ८० वर्षीय आजीसह मुलाने कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
दर्जेदार आरोग्य सेवा...
देवणीतील कोविड सेंटर हे सर्व सोयी-सुविधांनीयुक्त आहे. तेथील डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. पठाण, डॉ. धनाडे यांनी चांगल्या पद्धतीने उपचार केले. सोयीसुविधांमुळे वातावरण प्रसन्न आहे. तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनीही वेळोवेळी समोपदेश केले. त्यामुळे आम्ही आई- मुलाने कोरोनावर मात केली. खासगी दवाखान्यात भरमसाठ होणाऱ्या बिलापासूनही आम्ही बचावलो, असे उपचारानंतर ठणठणीत झालेले शिवाजी गिरी म्हणाले.