ग्रामपंचायतच्या २२९ जागांसाठी ५९९ नामांकनपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:14 IST2021-01-01T04:14:35+5:302021-01-01T04:14:35+5:30

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील २७ गावातील २२९ जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा ...

599 nomination papers filed for 229 Gram Panchayat seats | ग्रामपंचायतच्या २२९ जागांसाठी ५९९ नामांकनपत्र दाखल

ग्रामपंचायतच्या २२९ जागांसाठी ५९९ नामांकनपत्र दाखल

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील २७ गावातील २२९ जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विविध राजकीय पक्षांचे तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्यासह निवडणूक जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. साकोळ, येरोळ, डिगोळ, तळेगाव (दे), कानेगाव, सुमठाणा, बोळेगाव (बु), चामरगा, कारेवाडी, धामणगाव, लक्कडजवळग येथील निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून, त्यामुळे या ग्रामपंचायतींकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विविध अडचणी येत होत्या. त्यामुळे बुधवारी ऑफलाईन अर्ज दाखल करण्यासाठी सवलत देण्यात आली होती. या दिवशी सायंकाळी अनेक गावातील महिला, पुरूष, तरूण यांनी नामांकन पत्र भरण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी रांगा लागल्या होत्या.

Web Title: 599 nomination papers filed for 229 Gram Panchayat seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.