जिल्ह्यातील ५६ हजार शेतकरी झाले कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:20 IST2020-12-31T04:20:10+5:302020-12-31T04:20:10+5:30

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ मार्चपासून सुरु झाला. २ लाखापर्यंतच्या ७२ हजार ४५ थकित कर्जदार शेतक-यांपैकी ५६ ...

56,000 farmers in the district became debt free | जिल्ह्यातील ५६ हजार शेतकरी झाले कर्जमुक्त

जिल्ह्यातील ५६ हजार शेतकरी झाले कर्जमुक्त

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ मार्चपासून सुरु झाला. २ लाखापर्यंतच्या ७२ हजार ४५ थकित कर्जदार शेतक-यांपैकी ५६ हजार ५५ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. खरीपातील सोयाबीन काढणीवेळी अतिवृष्टी झाल्याने १ हजार हेक्टरवरील जमीन खरडून गेली तर २ लाख ५१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शासनाकडून पहिल्या टप्प्यात १२८ कोटी ९१ लाख उपलब्ध झाले. १२५ कोटी १५ लाख थकित राहिले आहेत.

दरम्यान, बाजारपेठेत यंदा सोयाबीनचा दर वाढला असून हमीभावपेक्षा अधिक किमान ३०० प्रति क्विंटल मागे शेक-यांना मिळत आहेत. त्यामुळे यंदा नाफेडच्या हमीभाव खरेदीवर शेतक-यांच्या रांगा लागल्या नाहीत. वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे रबी पेरा १२७ टक्के झाला.

रेणापूर, जळकोट बाजार समितीवर प्रशासक...

रेणापूर, जळकोट बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने तिथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली.

लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळास फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यातील बाजार समित्या जवळपास दीड महिना बंद राहिल्या.

१४ बियाणे कंपन्यांवर गुन्हे...

सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या ८ हजार ३६७ तक्रारींची तपासणी करण्यात आली. भरपाईपोटी बियाणे, ६२ लाख रुपये देण्यात आले. तसेच अप्रमाणित बियाणेप्रकरणी १४ कंपन्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

Web Title: 56,000 farmers in the district became debt free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.