रेणापूर तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यापैकी फावडेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध निघाली आहे. तसेच २२ सदस्य बिनविरोध आले आहेत. ८२ प्रभागांतील २०५ सदस्यांच्या निवडीसाठी ४६० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत पुुरुष मतदार १८ हजार ७७५, तर महिला मतदार १६ हजार ८३७ अशा एकूण ३५ हजार ५९७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी ८८ मतदान केंद्रे असून ८८ ईव्हीएम मशीन आहेत. तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास २० ईव्हीएम मशीन राखीव ठेवण्यात आल्या आहेत. १२ सहायक निवडणूक अधिकारी, ८८ मतदान केंद्राध्यक्ष, प्रत्येक मतदान केंद्रावर तीन मतदान अधिकारी असे एकूण २६४ कर्मचारी व एक केंद्रावर एक पोलीस कर्मचारी असे ८८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार राहुल पाटील व निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार गोविंद येरमे यांनी दिली.
३५ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST