जिल्ह्यात आढळले नवे ३३ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST2021-06-23T04:14:16+5:302021-06-23T04:14:16+5:30
रुग्ण दुपटीचा कालावधी ६१० दिवसांवर कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के असून, मृत्यूचे प्रमाण २.६ टक्के आहे. सदर ...

जिल्ह्यात आढळले नवे ३३ रुग्ण
रुग्ण दुपटीचा कालावधी ६१० दिवसांवर
कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के असून, मृत्यूचे प्रमाण २.६ टक्के आहे. सदर प्रमाण गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहे. दरम्यान, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी मात्र वाढला आहे. तो ६१० दिवसांवर गेला आहे. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा आहे. शिवाय, निर्बंध उठल्यानंतरही दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांच्या खाली आहे. मंगळवारचा रॅपिड अँटीजन टेस्टचा पॉझिटिव्हिटी रेट २.१ टक्के तर प्रयोगशाळेतील चाचणीतील पॉझिटिव्हिटी रेट ३.७ टक्के आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एल.एस. देशमुख यांनी दिली.
४२ रुग्ण आयसीयूमध्ये
सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २९५ रुग्णांपैकी ४२ रुग्ण आयसीयूमध्ये, दोन रुग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर, २३ रुग्ण गंभीर बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर, ६६ रुग्ण मध्यम लक्षणाची परंतु ऑक्सिजनवर आणि ७८ रुग्ण मध्यम परंतु विनाऑक्सिजनवर असून, १२६ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत.