बाधित २१ अन् कोरोनामुक्त झाले २५ जण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:23 IST2021-08-23T04:23:05+5:302021-08-23T04:23:05+5:30

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत रविवारी ७०० व्यक्तींची तपासणी करण्यात आली.त्यात ११जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर १०५५ ...

Of the 21 affected, 25 were released | बाधित २१ अन् कोरोनामुक्त झाले २५ जण

बाधित २१ अन् कोरोनामुक्त झाले २५ जण

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत रविवारी ७०० व्यक्तींची तपासणी करण्यात आली.त्यात ११जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर १०५५ जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली.त्यात दहा जण बाधित आढळले आहेत. दोन्ही चाचण्या मिळून एकवीस नव्या रुग्णांची भर पडली आहे.प्रयोगशाळेतील चाचणीचा पॉझिटिव्हिटी रेट १.६ टक्के तर रॅपिड अंटीजन टेस्टचि पॉझिटिव्हिटी रेट ०.९ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी ३ हजार ७१५दिवसांवर गेला आहे.यामुळे लातूरला दिलासा आहे. सद्यस्थितीत १३२ रुग्ण जिल्ह्यात एक्टिवा आहेत. त्यांच्या संपर्कातील बहुतेक सर्वांचीच चाचणी करण्यात आली आहे. यामुळे कोरोना ची दुसरी लाट ओसरण्यात मदत होत आहे. जुलै च्या तुलनेत ऑगस्ट महिन्यामध्ये रुग्ण संख्या कमी झाली आहे असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Of the 21 affected, 25 were released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.