अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
मुंबईचा विकास आराखडा (२०३४) तयार करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आजमितीपर्यंत १३.५९ कोटी रुपये खर्च केले आहेत. विशेष कार्य अधिकारी असलेल्या रमानाथ झा यांच्या वेतनावर ४६.५५ लाख खर्च झाले आहेत. ...
सव्वाशे वर्षांपूर्वी ब्रिटिश आमदानीत स्थापन झालेल्या बॉम्बे, कलकत्ता व मद्रास या तीन सर्वात जुन्या उच्च न्यायालयांची नावे शहरांच्या बदललेल्या नावानुरूप बदलण्यासाठीचे विधेयक संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे. ...
धोकादायक अवस्थेतील ब्रिटिशकालीन रेल्वे पत्रीपूल पाडण्याची मोहीम रविवारी फत्ते करण्यात आली. या कामासाठी कल्याण-डोंबिवलीदरम्यान सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. ...
राज्यातील बरीच रुग्णालये ‘धर्मादाय’ असूनही टोलेजंग इमारत आणि पंचतारांकित वातावरणामुळे ती ‘धर्मादाय’ असल्याची खात्री रुग्णांना वाटत नाही. त्यामुळे सर्वसामान्य रुग्ण उपचारांपासून वंचित राहतात. ...
पती-पत्नी एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर बऱ्याच प्रकरणांमध्ये अपत्यांपासूनही दूर राहावे लागते, अशा परिस्थितीत पतींना आपल्या अपत्यांची भेट न होणे ही अत्यंत दु:खद अवस्था असते. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई पालिकेने यंदाही अनुयायांना उत्तमोत्तम नागरी सुविधा पुरविण्यावर भर दिला आहे. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २१ व्या स्मृती समारोहानिमित्त २४ व २५ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर तरी राजकारण करू नका. राज्याच्या हिताचा विचार असेल तर विधिमंडळात चर्चा करा. कोणत्याही चर्चेस उत्तर देण्याची आमची तयारी आहे, असे प्रतिआव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिले. ...