उल्हासनगर महापालिकेतील सत्ताधारी साई पक्षात उभी फूट पडूनही महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या मदतीने पंचम कलानी शुक्रवारी बिनविरोध निवडून आल्या. साई पक्षाच्या फुटीर गटाला हाताशी पकडून भाजपाचे स्वप्न धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करणारी शिवसेना तोंडघशी पडली ...
एल्फिन्स्टन (प्रभादेवी) दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकांतील स्टॉल हटविण्याच्या सूचना न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिल्या. या सूचनेनुसार पश्चिम रेल्वेने १० तर मध्य रेल्वेने २६ स्थानकांतील स्टॉल हटवत प्रवाशांसाठी फलाट मोकळे केले आहेत. ...
सूक्ष्म वित्त संस्थांकडून (एनबीएफसी-मायक्रो फायनान्स) दिली जाणारी छोटी कर्जे पाव टक्क्यांपर्यंत महागण्याची शक्यता आहे. या संस्थांनी कर्जदारांकडून वसूल करण्याच्या किमान व्याजदरात रिझर्व्ह बँकेने ०.१० टक्के वाढ केली आहे. ...
पूरग्रस्त केरळच्या मदतीसाठी जीएसटीवर १० टक्के अधिभार लावण्यासंबंधी केंद्र सरकारचा मंत्रिगट अभ्यास करणार आहे. हा मंत्रिगट स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी जीएसटी परिषदेने घेतला. ...
भीमा-कोरेगाव दंगलीत आरोप असलेल्या पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोन विरुद्ध एक अशा फरकाने निकाल देऊन हस्तक्षेप करण्यास नकार दिला असला, तरी न्या. धनंजय चंद्रचूड यांनी पोलिसांच्या कारवाईविषयी शंका व्यक्त केली आहे. ...
कोरेगाव-भीमा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर भाजपने काँग्रेस आणि अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पुन्हा हल्ला केला आहे. ‘‘ मूर्खांचे नंदनवन म्हणजे ‘काँग्रेस’ अशा परखड शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ...
स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे शुक्रवारी कोरिया ओपनमधून आव्हान संपुष्टात आले. जपानची नोजोमी ओकुहारा हिने जवळपास तासभर चाललेल्या उपांत्यपूर्व सामन्यात सायनाचा २१-१५, १५-२१, २०-२२ ने पराभव केला. ...
भारतीय खेळ महासंघाने यंदाच्या वर्षात नवीन सहा खेळ प्रकारांना मान्यता दिली असून, त्यात पूर्वीचा आट्यापाट्या खेळासह सेपक टाकरा, रब्बी, टेनीक्वाईट, मॉडर्न पेंटथलॉन, सॉफ्ट टेनिस या खेळांचा समावेश शालेय क्रीडा प्रकारात झाला आहे. ...