त्यानुसार दादर, झवेरी बाजार यांसारख्या गजबजलेल्या बाजारपेठा गुढीपाडव्यापर्यंत बंद ठेवण्यात येतील. तसेच मुंबईतील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट, मनीष मार्केट, बोरा बाजार, चर्चगेट, कुलाबा, गेट वे आॅफ इंडिया परिसरातील दुकानेही एकदिवसाआड बंद राहतील. ...
गुरुवारी सेव्हन हिल्स रुग्णालयात ९६ , मिराज हॉटेल येथे ६ आणि निरंता हॉटेलमध्ये ७ आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे अशा प्रकारे १०९ जणांचे अलगीकरण करण्यात आले. ...
सिंगापूरहून मुंबई विमानतळावर सहा जण आले होते. त्यांची विमानतळावर तपासणी केली असता, कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा (घरगुती अलगीकरण) शिक्का मारण्यात आला होता. ...
राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई डबेवाल्यांची सेवा २० मार्च ते ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट आणि मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाने घेतला आहे. ...
‘वर्किंग डे’ असलेल्या १८ मार्च रोजी उपनगरी रेल्वे मार्गावरील सुमारे २२ लाख प्रवासी घटले. १८ मार्च रोजी सर्वात कमी प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. ...
गर्दी करण्याचे टाळण्यासाठी आपण सर्वांनी मिळून रविवार, २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’चा प्रयोग करू या. त्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांनी घरातच राहू या ...