जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढला. पुण्यात धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला तर खान्देशात रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली. विदर्भात रविवारी नागपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा व गोंदिया या पाच जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. ...
भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आदी सहभागी झाले होते. ...
पुणे विभागात रविवारी ९७१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७६७, सातारा जिल्ह्यात ५३, सोलापूर जिल्ह्यात १०१, सांगली जिल्ह्यात १३ तर कोल्हापूर जिल्ह्यात ३७ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. ...
राज्यात जवळपास ४० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होतो. महाबीजसह काही खासगी कंपन्यांचेही बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहे. या तक्रारींचा निपटारा केला जात आहे. ...
सूर्यास्त होताच महामार्गावरील ढाब्यांमध्ये झगमगाट सुरू होतो. एक एक करत चारचाकी, दुचाकी वाहने थांबायला लागतात. जेवणाची आॅर्डर देऊन त्यासोबत मद्यप्राशनही सुरू असते. ...
रावेर तालुका केळीचे माहेर म्हणून ओळखला जातो. हवामानावर आधारित फळपीक विमा योजना केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी निराधार ठरली असून जूनच्या पहिल्या पंधरवड्यात वादळी पावसाने तडाखा दिल्याने सुमारे ३५ गावांमधील ९०० हेक्टरवरील कापणीवरील केळीबागा भुईसपाट झाल्या. ...
या ठिकाणी एकूण १० हजार खाटांची सोय असून, त्यांचा वापर प्रामुख्याने सौम्य लक्षणे दिसणाऱ्या किंवा लक्षणे न दिसणा-या राजधानीतील कोरोना रुग्णांसाठी ‘आयसोलेशन सेंटर’ म्हणून केला जाईल. ...