lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > वर्तुळ पुन्हा होणार?; १९५३ नंतर पुन्हा एअर इंडियाची सूत्रे टाटांकडे येण्याची चिन्हे

वर्तुळ पुन्हा होणार?; १९५३ नंतर पुन्हा एअर इंडियाची सूत्रे टाटांकडे येण्याची चिन्हे

अधिग्रहण यशस्वी झाल्यास टाटा समूह १९५३ नंतर प्रथमच एअर इंडियाच्या कॉकपीटमध्ये प्रवेश करील. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 04:17 AM2020-12-15T04:17:10+5:302020-12-15T06:49:26+5:30

अधिग्रहण यशस्वी झाल्यास टाटा समूह १९५३ नंतर प्रथमच एअर इंडियाच्या कॉकपीटमध्ये प्रवेश करील. 

Tata Sons poised to enter Air India cockpit after 1953 exit | वर्तुळ पुन्हा होणार?; १९५३ नंतर पुन्हा एअर इंडियाची सूत्रे टाटांकडे येण्याची चिन्हे

वर्तुळ पुन्हा होणार?; १९५३ नंतर पुन्हा एअर इंडियाची सूत्रे टाटांकडे येण्याची चिन्हे

नवी दिल्ली : मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंत असंख्य क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या टाटा उद्योगसमूहाने सरकारी हवाई वाहतूक कंपनी ‘एअर इंडिया’च्या अधिग्रहणासाठी ‘इरादापत्र’ सादर केले असून, हे अधिग्रहण यशस्वी झाल्यास टाटा समूह १९५३ नंतर प्रथमच एअर इंडियाच्या कॉकपीटमध्ये प्रवेश करील. 

टाटा समूह ‘एअर इंडिया’च्या अधिग्रहणाचा गंभीरपणे विचार करीत असून, १४ डिसेंबरला विहित मुदतीपूर्वीच आपली निविदा सादर करणार असल्याचे वृत्त कित्येक माध्यमांनी दिले आहे. भारत सरकारने जानेवारीमध्ये एअर इंडियासाठी निविदा मागविल्या होत्या. एअर इंडियातील १०० टक्के हिस्सेदारी सरकार विकणार आहे. त्यासोबतच उपकंपनी ‘इंडियन एक्स्पेस’मधील १०० टक्के हिस्सेदारी आणि एअर इंडिया सॅट्स एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रा. लि.मधील ५० टक्के हिस्सेदारीही विकण्यात येणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाकरिता इरादापत्र सादर करण्यासाठी टाटा समूहाने मलेशियाच्या एअर एशिया समूहासोबतच्या आपल्या भागीदारीतील उद्यमाचा वापर केला आहे. टाटा समूह एअर एशियामधील आपली हिस्सेदारी हळूहळू वाढवून २०२०-२१ अखेरपर्यंत ७६ टक्क्यांच्या वर नेणार असल्याचे वृत्त आहे. 

२०१८ मध्ये सरकारने एअर इंडिया विकायला काढली होती. मुदतवाढ देऊनही तेव्हा एकही निविदा प्राप्त झाली नव्हती. त्यामुळे आता सरकारने सर्व १०० टक्के हिस्सेदारी विकायला काढली आहे. खरेदीदार मिळावेत यासाठी सरकारने एअर इंडियाचे कर्ज ६२ हजार कोटींवरून २३,२८६ कोटींवर आणले आहे.

अधिग्रहणाची शक्यता
वास्तविक एअर इंडिया ही मूळची टाटाच्याच मालकीची कंपनी होती. १९३२ मध्ये ‘टाटा एअरलाइन्स’ नावाने तिची स्थापना झाली होती. १९५३ मध्ये सरकारने तिचे राष्ट्रीयीकरण केले होते. आता टाटाकडूनच कंपनीचे अधिग्रहण केले जाण्याची शक्यता अधिक आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

Web Title: Tata Sons poised to enter Air India cockpit after 1953 exit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.