वादग्रस्त ठिकाणी केलेली पक्की बांधकामे तोडण्यास चीनच्या सैन्याने रविवारीच सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी सैन्य तुकड्या व वाहनेही माघारी घेण्यास सुरुवात केली व त्याठिकाणी ठोकलेले तंबूही काढले. सर्वात शेवटी अवजड चिलखती वाहने मागे घेण्यात आली. ...
कोणतेही कारण नसताना पाकिस्तानने छोट्या शस्त्रांतून आणि उखळी तोफांनी मारा करून शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केले. दोन्ही बाजूंनी ४५ मिनिटे तोफमारा सुरू होता, असे संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले. ...
यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे सुरुवातीचे तीन महिने कोरोना महामारीमुळे वाया गेल्यामुळे उरलेल्या वेळात विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी विविध विषयांच्या पाठ्यक्रमांची त्याअनुरूप फेररचना करून सुमारे ३० टक्के अभ्यास कमी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मन ...
कोरोना महामारीच्या प्रसारास आळा घालण्यासाठी लागू असलेल्या निर्बंधांमुळे सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांच्या सुनावणीवर परिणाम होण्याखेरीज उच्च व सर्वोच्च न्यायालयावरील न्यायाधीशांच्या नेमणुकांसाठी निवड व शिफारस करण्याचे कामही बंद पडले आहे. ...
मास्कच्या खरेदीत सर्वसामान्य जनतेची लूटमार होत आहे. वाट्टेल त्या किमतीत मास्क विकले जात आहेत. या महामारीत रावाचे रंक होत असताना काही कंपन्या स्वत:च्या सात पिढ्यांसाठी मृतांच्या टाळूवरचे खात उद्धार करून घेत आहेत. हे संतापजनक आहे. ...
कोरोना महामारीविरुद्धच्या लढ्यासाठी मोदी ज्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत आहेत, तो कायदा २००५ मध्ये ‘संपुआ’ सरकारनेच केलेला आहे, हे काँग्रेस सोयीस्करपणे विसरते. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. या कायद्याच्या विधेयकाला मोदींनी कडाडून ...
‘शेळी होऊन अनेक वर्षे जगण्यापेक्षा वाघ म्हणून एक दिवस जगा’ हा बाबासाहेबांचा संदेश होता. परिणामी, दलित तरुणांत असंतोष धुमसू लागला. त्याच असंतोषाचे दुसरे नाव आहे ९ जुलै १९७२ रोजी जन्माला आलेली दलित पँथरची चळवळ. दलित पँथरने राज्यात चांगलाच दरारा निर्माण ...
जुलैच्या पहिल्या पाच दिवसांत भारतात एक लाखाहून अधिक कोविड केसेसची नोंद करण्यात आली आहे. अर्थात दर दिवसाला सरासरी वीस हजार रूग्ण नोंदविले गेले. भारतात एकूण रुग्णांची संख्या सात लाखांपेक्षा जास्त झाली आहे. ...
डब्ल्यूएचओच्या कोविड १९ साथीच्या तांत्रिक विभागाचे नेतृत्व करणाऱ्या मारिया व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या, हवेद्वारे कोरोनाचा होणारा संसर्ग आणि ऐरोसोल प्रसारण यापैकी एखाद्या पद्धतीने संक्रमण यावर आम्ही विश्लेषण करत आहोत. ...