विना परीक्षा पदवी देता येणार नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर परीक्षा कशा घ्याव्यात, याबाबत निर्णय घेण्यासाठी कुलगुरूंची समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला पहिला अहवाल सादर केला आहे. ...
‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९’ म्हणजे आरटीईअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे ...
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३७ टक्के झाले असून मृत्युदर ३.१ टक्के आहे. दिवसभरात ११ हजार १५८ रुग्ण बरे झाले, तर आतापर्यंत ५ लाख ७३ हजार ५५९ रुग्ण कोविडमुक्त झाले. ...
राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. मात्र अनलॉक-४ अंतर्गत दिलेल्या सवलतींची अंमलबजावणी २ सप्टेंबरपासून म्हणजे गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून होणार आहे. ...
कोरोनामुळे तब्बल तीन महिन्यांनी १९ जूनपासून अखेर इंडिगोने दिल्ली - औरंगाबाद - दिल्ली या हवाई मार्गावर उड्डाण सुरू केले. त्यानंतर १५ जुलैपासून इंडिगोकडून हैदराबादसाठीही विमानसेवा सुरू करण्यात आली. ...