हा शोध अमेरिका, चीन, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया या देशातील संशोधकांनी लावला आहे. प्राण्यांमध्ये असणारे हे नवे विषाणू माणसांमध्येही संक्रमित होऊन त्यामुळे नव्या आजाराची साथ केवळ चीनमध्येच नव्हे तर साऱ्या जगभर पसरू शकते. ...
तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा मोदी यांनी काल केली होती. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी या दोघांनी मोदी यांना पत्रे पाठविली आहेत. अजय मिश्रा याच्या मुलाने अंगावर गाडी घालून शेतकऱ्यांची हत्या केल्याचा आरोप असून याप्रकरणी त्याला अटकही झालेली आहे. ...
महेंद्रसिंग टिकैत यांनी १९८८ साली शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीच्या बोट क्लब येथे ठिय्या आंदोलन सुरू केले होते. त्यासाठी देशभरातून पाच लाख शेतकरी तिथे जमले होते. विजय चौक ते इंडिया गेटपर्यंतचा सारा परिसर शेतकऱ्यांनी व्यापला होता. ...
टिकैत म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी इतकीही गोड भाषा वापरू नये की ज्यापुढे मधही फिका पडेल. टीव्हीवरून घोषणा करताना मोदींनी जी मधाळ भाषा वापरली तीच त्यांनी शेतकऱ्यांशी बोलणी करतानादेखील कायम ठेवावी. ...
स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहराचे स्थान यंदा ३५ वरून ३७ व्या स्थानावर घसरले आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारी महापालिका म्हणून मुंबई महापालिकेचा गौरव करण्यात आला आहे. ...
"आज कोरोनाचे रुग्ण कमी आहेत, ही बाब सकारात्मक असून, त्याने थांबलेले जीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे. लसीसंदर्भात काही अफवा पसरविण्यात आल्याने लसीकरणाची गती कमी झाल्याचे दिसून येते. परंतु समाजातील मान्यवरांनी सांगितल्यास सामान्य नागरिक ऐकतात." ...
सुबोध जयस्वाल उपमहानिरीक्षक असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली तेलगी बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक नेमण्यात आले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने या तपासाबाबत जयस्वाल यांच्यावर ताशेरे ओढत संबंधित तपास सीबीआयकडे वर्ग केला ...
स्वाती ढुमणे तीन वनमजुरांसह त्यावेळी जंगलात वाघांचे चिन्ह सर्वेक्षण (ट्राॅन्झिट लाइन सर्व्हे) करीत होत्या. कक्ष क्रमांक ९७ मध्ये सुमारे २०० मीटरवर त्यांना माया वाघीण दिसली. वाघिणीला बघून त्यांनी आपला मार्ग बदलला. मात्र, काही वेळातच अचानक वाघिणीने स् ...
शुक्रवारी सकाळी पोलीस मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी रुग्णालयात आले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, श्रीकेश यांचा श्वास सुरू आहे. पोलिसांनी डॉक्टरांना पाचारण केले. डाॅक्टरांनी तपासल्यानंतर ते जिवंत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर आता जिल्हा रुग्णालयात ...