नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
झुडपात लपलेल्या ‘दोन’पेक्षा हातातला ‘एक’ पक्षी महत्त्वाचाच ! अग्निपथ योजनेबाबत एकांगी टीका उपयोगाची नाही. मराठी युवकांनी या योजनेचा फायदा घेतला पाहिजे. त्यासाठीच्या तयारीला लागलं पाहिजे. ...
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नामांतराचा जिन बाहेर काढण्यात आला. यातला राजकीय विरोधाभास असा की, तत्कालीन युती सरकारने काढलेले नामांतराचे नोटिफिकेशन १९९९ मध्ये रद्द करणारे काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष यावेळी मात्र या निर्णयाच्या पाठीशी आहेत! ...
बहुतांश भागात कावळ्यांना गाठीया, पोपटाला चपाती, श्वानांना दूध-चपाती तसेच या आणि अशा प्रकारचे मानवी अन्न त्यांना दिले जाते. ते पशुपक्ष्यांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. ...
निधी आटल्याने खर्च वाढला; २०२२ च्या एप्रिल महिन्यात एकही स्टार्टअप उघडली गेली नाही. १०० दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक निधी उभारणाऱ्या स्टार्टअप अगदी थोड्याच. ...