CoronaVirus Kolhapur : जि.प.अध्यक्ष बजरंग पाटील पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 19:29 IST2021-05-22T19:29:02+5:302021-05-22T19:29:59+5:30
CoronaVirus Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना उपचारासाठी डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

CoronaVirus Kolhapur : जि.प.अध्यक्ष बजरंग पाटील पॉझिटिव्ह
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना उपचारासाठी डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळातही अध्यक्ष पाटील हे सातत्याने जिल्हा परिषदेत येत होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या आठवड्यात झालेल्या बैठकीलाही उपस्थिती दर्शवली होती. शुक्रवारी जिल्हा परिषदेत झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीलाही ते उपस्थित होते.
सुरुवातीला त्यांचा अँटिजन चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र आरटीपीसीआरचा अहवाल शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आला. त्यांना त्रास नसला तरी त्यांचे वय ७४ असल्यामुळे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे शुक्रवारच्या बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना आणि अध्यक्ष शाखेतील कर्मचाऱ्यांना अलगीकरणामध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.